एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात मटका जुगारावर धडक कारवाई; ६ जण ताब्यात, ₹१९,६०२ जप्त

एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात मटका जुगारावर धडक कारवाई; ६ जण ताब्यात, ₹१९,६०२ जप्त

बेळगाव : एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत दोन स्वतंत्र प्रकरणांत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण १९ हजार ६०२ रुपये रोख रक्कम व जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी एपीएमसी मार्केट यार्ड परिसरात सार्वजनिक ठिकाणी काही इसम मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पहिल्या कारवाईत विनायक विजयकुमार कोलकार (वय १९, रा. रामनगर, कंग्राळी के.एच.) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ हजार रुपये रोख व मटका अंक लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

त्याच दिवशी झालेल्या दुसऱ्या कारवाईत किरण सुरेश बजंत्री, मारुती भरमा रजाय, शुभम कृष्ण कडीमनी, अनूप महादेव कंबीर आणि विनायक मोतीलाल सोनारवाडी या पाच जणांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून १८ हजार ६०२ रुपये रोख व मटका चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

या दोन्ही प्रकरणांमध्ये एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४/२०२६ व ०५/२०२६ अन्वये कर्नाटक पोलीस कायद्याच्या कलम ७८(iii) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

सदर कारवाई पीएसआय, एएसआय व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली असून त्यांच्या कार्याचे पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच डीसीपी यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =

error: Content is protected !!