एस. पी. एम. रोड येथील रॉ जिम्नॅशियममध्ये पार पडलेल्या 6व्या ‘मी. रॉ फिटनेस 2026’ जिममर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय मुतकेकर याने विजेतेपद पटकावले. उपविजेता म्हणून सुनील गुंजळ याने मान मिळवला, तर मास्टर्स गटात संदीप पाटील हा विजेता ठरला. स्पर्धेला खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी माने, कांचन चौगुले, काजल चौगुले, विकास कलघटगी आणि मल्हारी दिवटे उपस्थित होते. पंच म्हणून राजेश लोहार, अनिल अंबरोळे, बाबू पावशे आणि संतोष सुतार यांनी काम पाहिले. स्टेज मार्शल म्हणून राजेश पाटील, तानाजी चौगुले आणि सोमनाथ हलगेकर यांनी जबाबदारी सांभाळली.
यंदाच्या स्पर्धेत एकूण ४२ स्पर्धकांनी सहभाग घेत आपली दमदार शरीरयष्टी सादर केली. खेळाडूंच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे वातावरणात चांगलीच रंगत निर्माण झाली होती.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विजय चौगुले, सोमनाथ बिर्जे, युवराज पाटील, यश चौगुले आणि सुनील लाटूकर या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे ‘मी. रॉ फिटनेस 2026’ स्पर्धा उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.
