अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सांत्वनभेट; सीमाप्रश्नावर सकारात्मक आश्वासन

अजितदादा पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची महाराष्ट्र एकीकरण समितीकडून सांत्वनभेट; सीमाप्रश्नावर सकारात्मक आश्वासन

बेळगाव :
नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शोकभावना व्यक्त करण्यात आल्या. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर तसेच समिती कार्यकर्त्यांनी बारामती मुक्कामी गोविंदबाग येथे जाऊन माननीय शरद पवार साहेब व त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे व तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर यांनी अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मात्र, स्वतःच्या दुःखाला बाजूला ठेवत माननीय शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमाप्रश्नी खटल्याबाबत सविस्तर चौकशी केली.

समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सीमाभागात सध्या सुरू असलेल्या कन्नडसक्तीबाबतची सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली. तसेच अल्पसंख्यांक आयोगासंदर्भातील घडामोडी व सीमा प्रश्नावरील सद्यस्थितीवर सखोल चर्चा झाली. या प्रश्नावर संसदेत प्रभावीपणे आवाज उठविण्याबाबत शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सूचनाही दिल्या.

यावेळी शरद पवार यांनी, आपण स्वतः दिल्लीला गेल्यानंतर या संपूर्ण विषयाकडे जातीने लक्ष घालू, असे आश्वासन समिती पदाधिकाऱ्यांना दिले.

या भेटीप्रसंगी उमेश पाटील, शिवाजी पाटील, सुहास हुद्दार, शुभम हंडे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

10 − 5 =

error: Content is protected !!