बामणवाडी (ता. बेळगाव) :
अदानी समूहाच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत बामणवाडी येथील शासकीय शाळेत विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू व उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सुमारे २५ विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स, वह्या, पेन तसेच टोप्या अदानी समूहाकडून देण्यात माजी महापौर विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी अदानी समूहाच्या कर्मचाऱ्यांचीही सक्रिय उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी श्रीनिवास शाली यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधून भेटवस्तूंची खरेदी व नियोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमावेळी अॅलन विजय मोरे व निलेश गवाडे उपस्थित होते व त्यांनी वितरणासाठी सहकार्य केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांना आवश्यक मदत मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेतील शिक्षकवर्ग व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत अदानी समूहाच्या सामाजिक बांधिलकीचे व समुदाय विकासातील योगदानाचे कौतुक केले.
