अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरात ही स्पर्धा होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये व्यासपीठ धैर्य, आत्मविश्वास, वक्तृत्व कौशल्य आणि विचार प्रभावीपणे मांडण्याची कला विकसित व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा तीन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. प्राथमिक (४थी ते ७वी), माध्यमिक (८वी ते १०वी) आणि महाविद्यालयीन (११वी ते पदव्युत्तर) या गटांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागाची संधी देण्यात आली आहे. प्रत्येक गटासाठी ४ विषय निश्चित करण्यात आले आहेत.
स्पर्धेत विजेत्यांना प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम असे बक्षीस दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे संपर्क साधावा. प्रत्येक गटात पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश मिळणार आहे.
नोंदणीसाठी संपर्क :
श्रीकांत कदम – 7019668025
प्रतीक पाटील – 7338145673
अधिक माहितीसाठी :
अध्यक्ष अंकुश केसरकर – 9739963229
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव
