अभिजात मराठी संस्थेतर्फे ‘वाचक महोत्सव’चे आयोजन

अभिजात मराठी संस्थेतर्फे ‘वाचक महोत्सव’चे आयोजन

बेळगाव : मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने बेळगावातील अभिजात मराठी संस्था यांच्यावतीने यंदा ‘वाचक महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिर सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या उपक्रमांतर्गत दहाहून अधिक वाचक “आपल्याला आवडलेले पुस्तक” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांवर आधारित विचारमंथन, अनुभव आणि वाचनप्रेरणा यामुळे हा महोत्सव रसिकांसाठी विशेष ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. चैतन्य हलगेकर हे राहणार असून साहित्यप्रेमींसाठी हा एक विचारांची देवाणघेवाण घडवून आणणारा व्यासपीठ ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. सध्या देशपांडे व कार्यवाह अनंत लाड यांनी हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे कळविले असून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Oplus_131072
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

error: Content is protected !!