बेळगाव – एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (#AAI) चे अध्यक्ष श्री. विपिन कुमार (IAS) यांनी आज बेळगाव विमानतळाला भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीत जागतिक दर्जाच्या नव्या टर्मिनल इमारतीच्या बांधकामासह पॅसेंजर बोर्डिंग ब्रिजेस उभारणीचे काम आणि एप्रॉन बेचा विस्तार व पुनर्रचना या कार्यांची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे विमानतळाची क्षमता आणि कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
यावेळी त्यांनी विमानतळ अधिकारी व तांत्रिक पथकांसोबत संवाद साधत प्रादेशिक हवाई संपर्क मजबूत करण्यासाठी या प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व स्पष्ट केले. कामांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान निर्माण होणाऱ्या कार्यात्मक अडचणींचा आढावा घेत, त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही श्री. कुमार यांनी दिले. त्यांच्या या भेटीमुळे बेळगाव विमानतळ विकास प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
