बेळगाव जिल्ह्यातून 70 स्केटर्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

बेळगाव जिल्ह्यातून 70 स्केटर्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

🛼 बेळगाव जिल्ह्यातून 70 स्केटर्सची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड! 🏅

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे आयोजित 19 व्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी 2025 यशस्वीरित्या पार पडली असून या निवड चाचणीतून बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 70 सर्वोत्तम स्केटर्सची निवड 41व्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धा लवकरच बेंगळुरू, कारवार आणि तुमकूर येथे पार पडणार आहेत.

जिल्हास्तरीय विजेत्या स्केटर्सना शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षा सौ. ज्योती चिंडक यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले. या वेळी प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर, विठ्ठल गंगणे तसेच अनेक स्केटर्स व पालक उपस्थित होते.

🏆 स्पर्धेतील प्रमुख विजेते:
स्पीड स्केटिंग प्रकारात ऋषीकेश पसारे, सौरभ साळोखे, भव्य पाटील, आर्या कदम, वीर मोकाशी, शल्य तरळेकर, विनायक पाटील, अवनीश कामनवर, आरव शेख, विधी लोहे, अमिषा वेर्णेकर, आरोही शिलेदार आदी स्केटर्सनी चमकदार कामगिरी केली.
फ्री स्टाईल स्केटिंगमध्ये इस्रा गवस, मनन आंबीगा, जयध्यान राज, रश्मीता आंबीगा, देवेन बामणे यांनी सुवर्ण पदके पटकावली.
आर्टिस्टिक स्केटिंगमध्ये खुशी आगशिमनी, तर अल्पाईन व डाउनहील स्केटिंगमध्ये साईराज मेंडके, आणि रोलर डर्बी प्रकारात खुशी घोटीवरेकर, शेफाली शंकरगौडा, अन्वि सोनार, सई शिंदे, मुद्लसिका मुलानी, अहद्द मुलानी यांनी सुवर्ण कामगिरी केली.

या स्पर्धेद्वारे बेळगावच्या स्केटिंगपटूंनी पुन्हा एकदा राज्यस्तरावर दमदार कामगिरीची नांदी दिली असून, प्रशिक्षक व पालकवर्गाने अभिमान व्यक्त केला आहे. 🏅

📍 बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने सर्व निवड झालेल्या स्केटर्सना हार्दिक शुभेच्छा! 🛼✨

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 9 =

error: Content is protected !!