बेळगाव │ क्रीडा क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटक तर्फे अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रामनाथ मंगल कार्यालय, अनगोळ – बेळगाव येथे पार पडणार आहे.
२०१७ पासून देशभरातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी कार्यरत असलेल्या मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया या संस्थेचे कार्य आता कर्नाटकातही जोमाने सुरू झाले आहे. ही संघटना Ministry of Corporate Affairs, Government of India अंतर्गत नोंदणीकृत असून कंपनी कायदा सेक्शन ६ नुसार अधिकृत मान्यता प्राप्त आहे. संस्थेची Khelo India, Fit India, Ministry of Sports and Youth Affairs तसेच ISO, Niti Aayog, TAFISA आणि International Olympic Sport Organisation Committee या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये नोंदणी आहे.
या संस्थेचा उद्देश देशातील सर्वसामान्य खेळाडूंना एक मजबूत आणि पारदर्शक स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करणे हा आहे.
बेळगावात होणाऱ्या या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत देशभरातील नामवंत पैलवान, वस्ताद आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोले (NIS कोच) यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रेक्षकांना या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन केले आहे.
👉 दिनांक: २५ व २६ ऑक्टोबर २०२५
👉 स्थळ: रामनाथ मंगल कार्यालय, अनगोळ – बेळगाव
👉 आयोजक: मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन कर्नाटक
कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
