१५ वर्षांचं स्वप्न अखेर साकार! — H.E.R.F Rescue Team च्या नवीन स्कूटर बोटचे उद्घाटन जल्लोषात

१५ वर्षांचं स्वप्न अखेर साकार! — H.E.R.F Rescue Team च्या नवीन स्कूटर बोटचे उद्घाटन जल्लोषात

१५ वर्षांचं स्वप्न अखेर साकार! — H.E.R.F Rescue Team च्या नवीन स्कूटर बोटचे उद्घाटन जल्लोषात

बेळगाव │ लोकसेवेसाठी अखंड झटणाऱ्या Helpline Emergency Rescue Foundation (H.E.R.F) या बेळगावमधील स्वयंसेवी संस्थेने आज आपल्या सेवायात्रेत नवा टप्पा गाठला आहे. गेल्या १५ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या टीमचं स्वप्न साकार झालं असून, किल्ला तलाव येथे नवीन स्कूटर बोटचे भव्य उद्घाटन पार पडले.

या विशेष सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी श्री. नारायण बरमणी, डीएफओ श्री. रंगनाथ राठोड (बेळगाव), एससीओसी टीम, तसेच H.E.R.F Rescue Team चे सीईओ श्री. बसवराज हिरेमठ उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते नव्या बोटचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रकल्पासाठी Aqua Alloys Pvt. Ltd., शिनोळी (बु), चंदगड या कंपनीने CSR निधीतून मोलाचे सहकार्य दिले आहे. कंपनीच्या अधिकारीवर्गाचे आणि सदस्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय असून, त्यांच्या सहकार्यामुळेच हे दीर्घकाळाचे स्वप्न साकार झाले.

कार्यक्रमात H.E.R.F चे सर्व स्वयंसेवक उत्साहाने सहभागी झाले. “लोकांची सेवा हाच आमचा धर्म” या ध्येयवाक्याने प्रेरित टीमने नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवी दिशा दाखवली आहे.

आजपासून ही स्कूटर बोट नागरिकांच्या सेवेसाठी अधिकृतपणे उपलब्ध झाली असून, पूरस्थिती, अपघात, आपत्ती किंवा कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी H.E.R.F Rescue Team सदैव सज्ज आहे.

📞 २४ तास आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक: 99 22 899 500

संपूर्ण कार्यक्रमात सर्व मान्यवर पाहुण्यांचे, Aqua Alloys Pvt. Ltd. कंपनीच्या अधिकारीवर्गाचे आणि स्वयंसेवक सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
बेळगावच्या सेवाभावाचे प्रतीक ठरलेले H.E.R.F Rescue Team चे हे पाऊल समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 🚤🌊

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − one =

error: Content is protected !!