हैदराबाद – एआयसीसी सचिव व खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर सध्या तेलंगणा काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानात सक्रीय सहभाग घेत आहेत. काल त्या हैद्राबाद येथे पोहोचल्या असून आगमनानंतर तत्काळ मेडचल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहून कार्यास प्रारंभ केला.
हैद्राबादपासून सुमारे ६० ते ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या या जिल्ह्यात ताईंनी प्रथम जिल्हाध्यक्ष तसेच आमदार आणि माजी आमदारांशी सविस्तर चर्चा केली. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून पक्षाची रचना व कार्यपद्धती अधिक बळकट करण्यासाठी त्या प्रत्यक्ष पातळीवर मार्गदर्शन करत आहेत.
डॉ. निंबाळकर येत्या ८ ते १० दिवस तेलंगणामध्ये राहून काँग्रेसच्या संघटन सृजन कार्यक्रमांतर्गत विविध जिल्ह्यांतील बैठका, समन्वय उपक्रम आणि पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय भूमिका निभावणार आहेत. त्यांच्या या सहभागामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
