बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून लोकमान्य रंगमंदिर, कोनवाळगल्ली येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन समिती नेते रमेश पावले यांनी केले. दीपप्रज्वलनाचा मान नेताजी जाधव, व्हाय. पी. नाईक, प्रा. मयुर नागेनहट्टी, प्रा. परसु गावडे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, सुरज कुडूचकर आणि किरण हुद्दार यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण व्हाय. पी. नाईक, प्रा. मयुर नागेनहट्टी, प्रा. परसु गावडे, प्रा. अरविंद पाटील, वृषाली कदम-दड्डीकर आणि सोनाली कांगले यांनी केले. स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन विभागांत पार पडली.
विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्राथमिक गट:
प्रथम – क्रांती मारुती पाटील
द्वितीय – पुर्वी रमेश घाडी
तृतीय – अथर्व विठ्ठल गुरव
उत्तेजनार्थ – अदिती दिनकर परमोजी
माध्यमिक गट:
प्रथम – साईराज राम गुरव
द्वितीय – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर
तृतीय – हर्ष गावडू पाटील
उत्तेजनार्थ – हर्षदा म्हात्रु भातकांडे
महाविद्यालयीन गट:
प्रथम – संकेत पाटील
द्वितीय – सायली तुपारे
तृतीय – आर्या गायकवाड
उत्तेजनार्थ – अनुजा लोहार
बक्षीस वितरण समारंभास समिती नेते रणजीत चव्हाण पाटील, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, संतोष कृष्णाचे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शिवानी पाटील, डॉ. पोटे, सविता डेगीनाळ, सागर पाटील, शिवराज पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, प्रशांत भातकांडे, बाळू जोशी, शेखर तळवार, उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक पाटील, विनायक कावळे, आशिष कोचेरी, अजय सुतार, आकाश भेकणे, रोहन कुंडेकर, साईराज जाधव, निखिल देसाई, रोहित गोमाणाचे, सुरज चव्हाण, जोतिबा पाटील, विकास भेकणे, महंतेश अलगोंडी, प्रवीण धामणेकर, अक्षय बांबरकर, सौरभ तोंडले, आनंद पाटील, महेश चौगुले, श्रीकांत कदम आदींनी परिश्रम घेतले.
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्यासोबतच मराठी भाषेप्रतीची ओढ आणि अभिमान स्पष्टपणे जाणवला.
