बेळगाव : हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारुती मंदिरामध्ये दसरा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला पारंपरिक सीमोलंघन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सायंकाळी वडगाव, जुने बेळगाव व अनगोळ भागातून आलेल्या पालख्या व भक्तांच्या आगमनाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. हजारो भक्तांनी उपस्थित राहून पारंपरिक व धार्मिक वातावरणात सीमोलंघनाचा आनंद लुटला.
मंदिर ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालख्यांचे व आगंतुक भक्तांचे स्वागत करून कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप दिले. रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू राहिले.
दसऱ्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व सीमोलंघनाचा आनंद घेतला.
