बेळगाव प्रतिनिधी :
म्हैसूर दसऱ्याच्या उद्घाटनासंदर्भात हमारा देश संघटना तर्फे दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:45 वाजता बेळगावच्या उपायुक्त कार्यालयात महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी अंदाजे 50 ते 60 कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांनी काळ्या फिती बांधून शांततामय मार्गाने आपला निषेध नोंदविला.
यंदा म्हैसूर दसरा उत्सवाचे उद्घाटन लेखिका भानू मुश्ताक यांच्या हस्ते होत आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचा आदर राखत संघटनेने स्पष्ट केले की, दसरा हा हिंदू संस्कृती व परंपरेशी घट्ट जोडलेला उत्सव आहे. त्यामुळे उद्घाटनाचा मान एखाद्या मान्यवर हिंदू व्यक्तिमत्वाला मिळायला हवा होता. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नसून, या उत्सवासोबत निगडित सांस्कृतिक आणि परंपरागत भावनांचा सन्मान राखणे हा उद्देश असल्याचे संघटनेने नमूद केले.
निवेदन स्वीकारताना उपायुक्तांनी ते राज्य सरकारकडे पाठविण्याची ग्वाही दिली.