बेळगाव (1 सप्टेंबर 2025) : मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर आणि केएलई हॉस्पिटल, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत आरोग्य तपासणी व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये 200 हून अधिक नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला. त्यामध्ये जवळपास 50 ते 55 रुग्णांना मोतीबिंदूचा दोष आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मातोश्री सौहार्द सोसायटी आणि केएलई हॉस्पिटल यांच्या तर्फे सर्व रुग्णांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे.
हा उपक्रम मातोश्री सौहार्द सोसायटीचे चेअरमन आर. एम. चौगुले आणि हर्षवर्धन इंचल यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित करण्यात आला होता.