बेळगाव जिल्हा शेतकरी शिक्षण समिती, बेळगाव संचलित भारती विद्यालय हायस्कूल, खासबाग (शहापूर) येथील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने विभागीय स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 🏆
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. शिवाजी शामराव देसाई व सचिव श्री. विजय बाबुराव मजुकर यांनी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
संघाच्या या यशामागे मुख्याध्यापक श्री. टी. एस. लामानी यांचे प्रोत्साहन, क्रीडाशिक्षक श्री. सुधीर विठ्ठल माणकोजी यांचे परिश्रम तसेच संघ व्यवस्थापक श्रीमती एस. बी. कुंभार आणि श्री. डी. एन. गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.
👉 विद्यार्थिनींच्या या कामगिरीमुळे शाळेचे नाव जिल्ह्यात गौरवास्पद ठरले आहे.