लक्ष्मी नगर, हिंडलगा येथे २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मोठ्या चोरीचा छडा कॅम्प पोलिसांनी लावला आहे. या कारवाईत तब्बल ८५ लाख रुपयांच्या दागिन्यांची जप्ती करण्यात आली आहे.
या प्रकरणात अन्नपूर्णा जोतिबा बेळगुंदकर (रा. गणेशपुर) आणि जोतिबा गुंडू बेळगुंदकर यांना अटक करण्यात आली आहे. चोरीतून एकूण ९८१.१ ग्रॅम सोने चोरीस गेले होते, त्यापैकी तब्बल ८७७.४ ग्रॅम सोने पोलिसांनी परत मिळविण्यात यश मिळवले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी, उपायुक्त एन. निरंजन राजेआरस व खडेबाजार एसीपी शेखरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कॅम्प पोलीस ठाण्याचे आनंद वनकुंद्री, डी. पी. निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने तपास करून ही मोठी कामगिरी पार पाडली.
👉 पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून मोठ्या चोरीच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.