मच्छे येथे गणेश विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू; सोशल वर्कर रेस्क्यू टीमने ३० मिनिटांत मृतदेह बाहेर काढला

मच्छे येथे गणेश विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू; सोशल वर्कर रेस्क्यू टीमने ३० मिनिटांत मृतदेह बाहेर काढला

बेळगाव : गणेश विसर्जनादरम्यान मच्छे येथे दुर्दैवी घटना घडली. गणेशमूर्ती विसर्जित करताना पाय घसरून एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सोशल वर्कर रेस्क्यू टीम, बेळगावने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अवघ्या १५ मिनिटांत पथक घटनास्थळी पोहोचले. पथकातील अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद होळी, शुभम होळी, मायकेल पिंटो, जगदीश गस्ती आणि राजू टक्केकर यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

शोधमोहीम राबवत अवघ्या ३० मिनिटांत तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

ही बचावमोहीम एसडीआरएफ, बेळगाव ग्रामीण पोलीस आणि बेळगाव अग्निशमन दलाच्या संयुक्त समन्वयाने पार पडली. घटनेनंतर सोशल वर्कर रेस्क्यू टीम आणि आपत्कालीन यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × one =

error: Content is protected !!