बेळगावात जायंट्स ग्रुप मेन तर्फे गणेशोत्सव स्पर्धा

बेळगावात जायंट्स ग्रुप मेन तर्फे गणेशोत्सव स्पर्धा

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन यांच्या वतीने यंदाही गणेशोत्सवानिमित्त श्री मूर्ती देखावा व उत्कृष्ट श्री मूर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या दोन्ही विभागांसाठी असणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांनी आपली नावे ३० ऑगस्टपर्यंत खालील ठिकाणी नोंदवावीत –
1️⃣ विजय अचमनी – अचमनी हार्डवेअर, गणपत गल्ली. ☎️ 9448147909
2️⃣ फॅशन कॉर्नर – टिळकवाडी. ☎️ 9590480505
3️⃣ संजय – नंदिनी डेअरी, केळकर बाग. ☎️ 9945945547
4️⃣ शिरोडकर ज्वेलर्स – खडेबझार, शहापूर. ☎️ 9448790612

स्पर्धेअंतर्गत मूर्ती व देखाव्यांचे परीक्षण ३१ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 3 =

error: Content is protected !!