बेळगाव : राज्य सरकारने 21 ऑगस्ट 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयात नोंद झालेल्या वाहतूक ई-चलन प्रकरणांवर आता दंडाची रक्कम भरताना 50% सूट मिळणार आहे. ही योजना 23 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत लागू राहणार असून या काळात नागरिकांना प्रलंबित दंड प्रकरणांची निकड फक्त अर्धा दंड भरून करता येणार आहे.
दंड भरण्यासाठीची सोय खालील बेळगाव वन /कर्नाटक वन केंद्रांवर करण्यात आली आहे :
- अशोक नगर,
- दूरदर्शन नगर (टीव्ही सेंटर),
- रिसालदार गल्लीत जुने कॉर्पोरेशन बिल्डिंग,
- गोवावेस.
तसेच दंड रक्कम वाहतूक व्यवस्थापन केंद्रात (Traffic Management Centre) जमा करता येणार आहे. यासाठी वाहन मालकांनी आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक देऊन जवळच्या पोलीस ठाण्यातही दंड भरता येईल.
पोलीस विभागाने नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.