बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर तीर्थ पाच्यापूर याने राष्ट्रीय पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनामार्फत त्याचा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा क्रीडागण येथे सत्कार करण्यात आला.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या शुभहस्ते तीर्थला प्रतिभा पुरस्कार, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शॉल, मोत्यांचा हार व म्हैसूर पगडी घालून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यावेळी जिल्हा प्रशासनाचे पदाधिकारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 स्केटिंगमधील आपल्या उल्लेखनीय कामगिरीने तीर्थ पाच्यापूरने केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नाव उज्ज्वल केल्याचे यावेळी गौरवोद्गार काढण्यात आले.