दैवज्ञ गणेशोत्सव मंडळ तर्फे श्री च्या मंडपाची मूर्तमेढ
बेळगाव – दैवज्ञ गणेशोत्सव मंडळाच्यावतीने श्री च्या मंडपाची मूर्तमेढ श्री कालिका मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी मुहूर्तमेढ पूजन प्रमुख पाहुणे सिनेमा फोटोग्राफी क्षेत्रातील दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते जयंत पेडणेकर तसेच मंडळाचे अध्यक्ष विनायक कणबरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने जयंत पेडणेकर यांचा विशेष सत्कार दैवज्ञ ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नितीन नंदाळकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी कारेकर व श्री कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीने दयानंद कारेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या सोहळ्याला हेमंत मुतकेकर, विशाल शिरोडकर, उमेश बांदिवडेकर, राजु बेकवाडकर, देविदास काकतिकर, अतुल परिशवाडकर, प्रशांत बेकवाडकर, प्रमोद पेडणेकर, शुभम कारेकर, विनय बांदिवडेकर, राघव काकतिकर, गणेश तेरगावकर, नितीन कलकटकर, दिपक कलघटगी, विवेक चिंचणेकर, राजेश कारेकर यांच्यासह अन्य सभासद आणि महिला मंडळातील कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यानंतर श्री कालिका महिला मंडळ तर्फे मंदिरामध्ये कुमकुम अर्चनाचा सोहळा पार पडला.