कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडपाच्या खांब पूजनाचा सोहळा उत्साहात
शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती, समाजकार्यकर्त्यांचा गौरव
बेळगाव : कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडपाच्या खांब पूजनाचा सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी आनंद व ऊर्जा यांचे दर्शन घडत होते. कार्यक्रमास मार्केटचे CPI महंतेंश धामणवर यांची विशेष उपस्थिती लाभली. सोशल वर्कर व शांताई वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विजय मोरे यांनी युवा पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. त्यांनी श्रीक्षेत्र दक्षिण काशी हे ऊर्जा व प्रेरणेचे मूळस्थान असल्याचे अधोरेखित केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी या माध्यमातून तरुणांना IAS, IPS सारख्या सेवेत प्रवेशासाठी प्रेरणा दिली. गल्लीतले ज्येष्ठ पंच अशोक जाधव, पप्पू लगाडे, हॉटेल सूर्या चे मालक वालवेकर साहेब, संदीप जाधव, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक जाधव व देसाई सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याला शोभा प्राप्त झाली.
हॉटेल विराटचे मालक व कपिलेश्वर गणेशोत्सव मंडळाचे आधारस्तंभ कपिल भोसले यांनीही खांब पूजेत सहभाग घेऊन आपली मोलाची भूमिका बजावली.
सुमारे १००० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात कॉर्पोरेशन हॉस्पिटलमधील मृतदेह विभागातील कर्मचारी, शववाहिनी चालक व इतर कामगार यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या अथक सेवाभावी कार्याची प्रशंसा करण्यात आली.
