बेळगाव महापालिका निवडणुकीतील अनियमिततेवर काँग्रेस गप्प, आज मात्र मतदान प्रक्रियेवर टीका.

बेळगाव महापालिका निवडणुकीतील अनियमिततेवर काँग्रेस गप्प, आज मात्र मतदान प्रक्रियेवर टीका.

बेळगाव : २०२१ मधील बेळगाव महानगर पालिका निवडणुकीत झालेल्या गंभीर अनियमितता, त्रुटी आणि बोगस मतदानाबाबत त्या काळी काँग्रेसने तोंड उघडले नव्हते. वार्ड पुनर्रचना आणि आरक्षणावरील खटला प्रलंबित असतानाही निवडणूक लादली गेली, हजारो मतदारांची नावे वगळली गेली, ईव्हीएमसोबत VVPAT न वापरता मतदान झाले, मृत व्यक्तींची नावे व शहराबाहेरील नावे याद्यांमध्ये समाविष्ट करून मतदान झाले, तरीही काँग्रेसने त्या वेळी शांतता पाळली होती.

आज मात्र काँग्रेसकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. स्वतः महापालिका निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव, घिसाडघाईत झालेली प्रक्रिया आणि बोगस मतदानाबाबत मौन बाळगणारी काँग्रेस आता लोकशाही वाचविण्याच्या गप्पा मारत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचा दुटप्पीपणा उघड झाल्याची प्रतिक्रिया सिमाभागातून उमटत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महापालिका निवडणुकीच्या वेळीच मतदारांचा विश्वास डळमळीत झाला होता. मात्र त्या काळात सत्ताप्राप्तीसाठी डोळेझाक करणारी काँग्रेस आज निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेची मागणी करतेय, हे केवळ राजकीय स्वार्थापोटी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

👉 त्यामुळे “महापालिकेच्या वेळी गप्प, आज मात्र आवाज उठवणे” हा काँग्रेसचा दुटप्पीपणा बेळगावात चर्चेचा विषय ठरला आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 8 =

error: Content is protected !!