बेळगाव – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारा विलंब टाळण्यासाठी आज बेळगाव शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी हिंडलगा गणेश मंदिर परिसरातील तलावा सह कपिलेश्वर तलाव, वडगाव तलाव यांची पाहणी केली. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या या पाहणीत तलाव परिसरातील सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा उपायांची तपासणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान पोलिस आयुक्तांसोबत गणेशोत्सव महामंडळ जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, उपाध्यक्ष सतीश गोरगोंडा, कार्यकारी सचिव आनंद आपटेकर, वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त जोतिबा निकम आणि बेळगाव दक्षिण वाहतूक पोलिस निरीक्षक बसनगौडा पाटील हेस्कॉम सेक्शन अधिकारी गलगली अधिकारी उपस्थित होते. पोलिस प्रशासनाकडून मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि वेळेवर विसर्जनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूक वेळेत व सुरक्षितरीत्या पार पडावी, यासाठी पोलिस विभाग सज्ज असल्याचे आयुक्त बोरसे यांनी यावेळी सांगितले.