बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच पूर्व-विद्यापीठ (बारावी) महाविद्यालयांना मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सतत सुरू असलेला मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा आदेश जारी केला आहे.
सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात न जाण्याचे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसाचा इशारा: बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळा-पीयू महाविद्यालयांना उद्या सुट्टी
