बेळगाव – महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने कन्नड सक्तीविरोधी मोर्चात मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मोर्चा यशस्वी करावा यासाठी पिरनवाडी व मच्छे भागात जनजागृती करण्यात आली. या मोहिमेदरम्यान ग्रामस्थांनी मोर्चाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
पिरनवाडीतील जनजागृतीत पिराजी मुंचडीकर, इम्रान मुजावर, सागर काजोळकर, भरत मेणसे, प्रल्हाद मुंचडीकर, संतोष मुंचडीकर, गंगाराम टक्केकर, सुरुज पेडणेकर, नागेश पाटील, दौलत पेडणेकर, बबन पेडणेकर, दिग्विजय देसाई, रमेश नाईक आदी सहभागी होते.
मच्छे येथील जनजागृतीत प्रसन्ना सातपुते, विनायक पाटील, विठ्ठल पाटील, राजू पावले, कार्तिक झेंडे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते. दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी मोर्चाच्या यशासाठी एकमुखाने पाठिंबा दर्शविला.