बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, बेळगाव संचलित सरस्वती विद्यामंदिर, किणये येथे शनिवार, १३ जून २०२६ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य श्री. अनिल पाटील हे होते. प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन शाळा सुधारणा मंडळाचे सदस्य श्री. यल्लाप्पा गुरव, संस्थेचे संचालक तथा शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. एस. डी. पाटील, सदस्य श्री. प्रकाश चव्हाण, श्री. खोबाण्णा डुकरे, श्री. सुशांत चव्हाण आणि श्री. अक्षय लोहार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती एस. वाय. बागेवाडी यांनी केले. यावेळी शाळा सुधारणा समितीतर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सुशांत चव्हाण आणि श्री. अक्षय लोहार यांनी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्हे व शैक्षणिक साहित्य प्रदान केले.
यावेळी शाळेच्या समाजशास्त्र विषयाच्या शिक्षिका श्रीमती एम. पी. यळ्ळूकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा, अभ्यास नियोजन आणि यशस्वी शैक्षणिक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
समारंभास शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम. एम. देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती आर. व्ही. पावले यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
