खानापूर तालुक्यात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढ व्हावी यासाठी विशेष अभियान; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा स्तुत्य उपक्रम

खानापूर तालुक्यात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढ व्हावी यासाठी विशेष अभियान; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा स्तुत्य उपक्रम

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्वच स्तरांवर विशेष मोहीम राबविण्याची गरज असून, यामध्ये पालक व शाळा सुधारणा समित्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गर्लगुंजी, बरगाव, निडगल, तोपिनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसुर, जळगे, रामगुरवाडी, भंडरगाळी येथील मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

गर्लगुंजी येथील सरकारी मराठी मुला-मुलींच्या प्राथमिक शाळेत साहित्य वाटप करताना अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले की, मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा समितीने घेतलेली पुढाकार स्तुत्य आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी अशा उपक्रमांना सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमात समिती कार्यकर्ते सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राजाराम देसाई, सुरेश मेलगे, मिलिंद देसाई, गोकुळ चौगुले (SDMC अध्यक्ष), सतीश पाटील, मुख्याध्यापिका एस. वाय. सोनार, तसेच शिक्षक व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रुमेवाडी येथे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन मातृभाषेतील शिक्षणासाठी प्रेरणा देण्यात आली. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गणेश हल्याळकर, युवा कार्यकर्ते संदेश कोडचवाडकर, प्रवीण कोडचवाडकर, कृष्णा चौगुले, महेश घाडी, संतोष बेडरे, प्रसाद खटोरे, जोतिबा बेडरे, रामा बिर्जे, अँथोनी फर्नांडिस, तसेच मुख्याध्यापक एस. डी. पाटील आणि शिक्षक उपस्थित होते.

जळगे येथील शाळेमध्ये साहित्य वाटप करताना संदेश कोडचवाडकर, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मल्हारी तोपिनकट्टी, मारूती लाड, महादेव निक्कलकर, बबन गुरव, दिपक तोपिनकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सीमाभागातील मराठी शाळांना नवीन ऊर्जा मिळाली असून, मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये पुन्हा भरवसा निर्माण होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × three =

error: Content is protected !!