बेळगाव |
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, व्यापारी बंधू किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, केळकर बाग, बेळगाव यांची वार्षिक सभा नुकतीच ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश उसूलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत मागील वर्षाच्या जमाखर्चाचा अहवाल सादर करण्यात आला व त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. तसेच येणाऱ्या वर्षात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
2025-26 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड खालीलप्रमाणे झाली:
- अध्यक्ष – श्री. दत्ता जाधव
- सचिव – श्री. गुरुनाथ किरमटे
- उपाध्यक्ष – श्री. दीपक ओझा, श्री. संजय पाटील, श्री. विनायक उसूलकर
- उपसचिव – श्री. दर्शन करमुसे
- जनरल सेक्रेटरी – श्री. परेश शिंदे
- कार्याध्यक्ष – श्री. वैभव धामणेकर
- उपकार्याध्यक्ष – श्री. विकास उसूलकर
- खजिनदार – श्री. संजय गावडे
सदस्यपदी – सुवर्णा उसूलकर, रूपा वाटके, श्रीधर कसलकर, आदित्य मुतकेकर, जय वाके, कल्पना उसूलकर, आशा धरमदासिनी, अनिता पवार,यांची निवड करण्यात आली.
स्मिता आर्य यांनी उपस्थित सभासदांचे आभार मानले आणि येणारा गणेशोत्सव अधिक प्रभावी व सामाजिकदृष्ट्या उपयुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.