अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची कारवाई; धारदार शस्त्रासह तरुण ताब्यात

अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची कारवाई; धारदार शस्त्रासह तरुण ताब्यात

बेळगाव शहरात अलीकडे वाढत असलेल्या स्टॅबिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून “अँटी स्टॅबिंग स्क्वॉड” मार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवार दि. ७ मे २०२६ रोजी मारिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली.

मुचंडी–बुड्र्याणूर रस्त्यावर संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या किरण दुर्गप्पा कड्यागोळ (वय २२, रा. कारांबळ, बेळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे बेकायदेशीररित्या धारदार लोखंडी कोयता आढळून आला.

मारिहाळ पोलीस ठाण्याचे पीएसआय श्री. मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध Arms Act 1959 कलम 27(1) तसेच Karnataka Police Act 1963 च्या कलम 97 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + nineteen =

error: Content is protected !!