बेळगाव, ता. २५ जुलै – भारत विकास परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बेळगावातील विविध शाळांमधून मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे.
या स्पर्धेत दोन विभाग आहेत – हिंदी देशभक्ती गीत व मराठी/कन्नड लोकगीत. हिंदी गीतासाठी “चेतना के स्वर” या परिषदेने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील गीत गाणे बंधनकारक आहे, तर लोकगीत कोणतेही चालेल. स्पर्धेसाठी इयत्ता ६ वी ते १२ वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. प्रत्येक गटात ६ ते ८ गायक विद्यार्थ्यांसोबत ३ पर्यंत वाद्यसहकारी असू शकतात. वीजेवर चालणाऱ्या वाद्यांना मात्र परवानगी नाही. प्रत्येक सादरीकरणासाठी ७ मिनिटांची मर्यादा असेल.
स्पर्धेतील हिंदी गीत विभागातील विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके दिली जाणार आहेत:▪️ प्रथम क्रमांक – ₹५,००० रोख व आकर्षक चषक▪️ द्वितीय क्रमांक – ₹३,००० रोख▪️ तृतीय क्रमांक – ₹२,००० रोख▪️ दोन उत्तेजनार्थ – प्रत्येकी ₹१,००० रोख
लोकगीत विभागातील विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्हे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे प्रदान केली जातील.प्रत्येक स्पर्धक गटाची निवड संगीत रचना, स्वर, ताल, शब्दोच्चार व एकूण प्रभाव या निकषांवर होणार आहे.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता गट प्रांतस्तरावर प्रतिनिधित्व करेल, त्यानंतर विभागीय आणि अखेर राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळणार आहे.स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा:
,
📞 रजनी गुर्जर – ९७४३४४१८२८ (स्पर्धा प्रमुख)
📞 लक्ष्मी तिगडी – ७०१९७२४२४८
– ८७९२२५८४७७ विनायक मोरे, अध्यक्ष, भारत विकास परिषद (बेळगाव शाखा)