बेंगळुरू : कर्नाटकमधील 2008 बॅचचे आयएएस अधिकारी श्री शेट्टेन्नवर एस. बी. सध्या सहकार विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. राज्य सरकारने त्यांच्याकडे आता बेळगाव विभागीय आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.विशेष म्हणजे, राज्य सरकारने बेळगाव विभागीय आयुक्तपदाला आता सचिव दर्जा बहाल केला असून, यामुळे या पदाचा दर्जा आणि वेतन सुद्धा सचिव पदाच्या समकक्ष करण्यात आला आहे. ही सुधारणा IAS (Pay) Rules, 2016 मधील नियम 12 अंतर्गत करण्यात आली आहे.
श्री शेट्टेन्नवर एस. बी. यांच्याकडे बेळगाव विभागीय आयुक्तपदाची अतिरिक्त जबाबदारी
