📍बेळगाव | प्रतिनिधी. अखिल कर्नाटक माजी सैनिक संघ बेळगाव जिल्हा घटकाच्या वतीने 26 जुलै 2025 रोजी कारगिल विजय दिवस तसेच ऑपरेशन सिंदूरचा यशस्वी गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी 21 जुलै रोजी कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि वीर नारी घटकाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत खालील उपक्रम होणार आहेत:
🔹 भव्य बाईक रॅली – सकाळी ८.३० वाजता न्यू गांधीनगर येथील एससी मोटर्सपासून सुरुवात होऊन शहरातून भ्रमण.
🔹 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार – माजी सैनिकांच्या मुलांनी १०वी व १२वी मध्ये ९०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान.
🔹 कारगिल युद्धातील सहभागी जवान व वीरमरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा गौरव.
🔹 आदर्श माजी सैनिक व आदर्श माजी सैनिक जोडपे पुरस्कार वितरण.
सदर प्रमुख कार्यक्रम शनिवार, २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता केपीटीसीएल हॉल, नेहरू नगर येथे पार पडणार आहे.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी देशभक्तीचा आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.