गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी’ योजना; परवानगी प्रक्रिया सोपी करण्याचा पोलिसांचा उपक्रम

गणेश मंडळांसाठी ‘एक खिडकी’ योजना; परवानगी प्रक्रिया सोपी करण्याचा पोलिसांचा उपक्रम

📍बेळगाव | प्रतिनिधी
शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवण्यासाठी यंदा “एक खिडकी” प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

पोलिस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री. बोरसे यांनी विविध खात्यांच्या समन्वयातून मंडळांसाठी ही प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. महापालिका, सार्वजनिक मंडळांचे प्रतिनिधी आणि विविध खात्यांचे अधिकारी यांच्यात समन्वय ठेवून “वर्किंग ग्रुप” स्थापन करण्यात येणार आहे.

बैठकीमध्ये मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर , लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे विजय जाधव , शहापूर मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, विकास कलघटगी, रणजीत चव्हाण पाटील आदींनी विचार व्यक्त केले.

बैठकीस माजी नगरसेवक रमेश सोंटक्की, राजू खटावकर, रोहित राऊळ, अशोक चिंडक, पोलिस उपायुक्त नारायण बरमणी, विजय जाधव, विकास कळसगडे, नेताजी जाधव आदी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना पोलिस आयुक्तांनी सांगितले की, गणेशोत्सवात गर्दीचे प्रमाण वाढते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही, यासाठी यंदा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही केली जाईल. अर्पण सोहळ्याच्या दिवशी विशेष वाहतूक नियंत्रणात ठेवली जाईल.

महत्त्वाचे म्हणजे, यंदा सर्व मंडळांनी एकाच ठिकाणी जाऊन परवानगीसाठी अर्ज करता येईल. यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्व कागदपत्रांची छाननी व मार्गदर्शन दिले जाईल.

गणेशोत्सव शांततेत व सुव्यवस्थेने पार पडावा, यासाठी यंत्रणांकडून योग्य ती काळजी घेतली जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

error: Content is protected !!