२०२१ मोर्चा खटल्याची पुढील सुनावणी २४ मार्चला; कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

२०२१ मोर्चा खटल्याची पुढील सुनावणी २४ मार्चला; कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या महामोर्चा प्रकरणातील खटल्याची पुढील सुनावणी मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन वकील महेश बिर्जे तसेच समिती नेत्यांनी केले आहे.

सदर मोर्चा धर्मवीर संभाजी महाराज चौकात पोलिसांनी अडविला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी चौकातच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत पोलिसांनी या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

खटला क्रमांक १४५/२०२१ हा पाचव्या अतिरिक्त न्यायालयात सुरू असून, अनेक कार्यकर्ते वारंवार गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने गैरहजर राहणाऱ्यांविरोधात अटक वॉरंट काढण्याचा इशारा दिला आहे.

मनोहर किनेकर, प्रकाश मरगाळे, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, किरण गावडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, श्रीकांत मांडेकर, रवी साळुंखे, धनंजय पाटील, मदन बामणे, मालोजी अष्टेकर, नेताजी जाधव, बंडू केरवाडकर, गजानन पाटील, संदीप चौगुले, दिगंबर कातकर, परेश शिंदे, विनायक सांबरेकर, हनुमंत मजुकर, रामचंद्र कुद्रेमणीकर, विनायक पावशे, नागेश किल्लेकर, उदय नाईक, अनिल हेगडे, माधुरी हेगडे, संदीप मोरे, मल्हारी पावशे, चेतन पाटील आणि कृष्णा गुरव यांच्यासह सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 7 =

error: Content is protected !!