बेळगाव : कडोली परिसरातील बांधकाम कामगारांच्या हितासाठी युनियनची स्थापना करण्यात येत असून, त्याचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने कामगारांना विविध योजनांबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
कडोली, चलेवनहट्टी, केदनूर, होनगा, आंबेवाडी, आलतगा आदी भागातील बांधकाम कामगारांना एकत्र आणण्यासाठी या युनियनची स्थापना करण्यात येत आहे. उद्घाटन सोहळा कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला बेळगाव कामगार जिल्हाध्यक्ष एन. आर. लातूर, ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर, कडोलीचे माजी तालुका पंचायत सदस्य उदय सिध्दनव्वर तसेच कामगार कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमादरम्यान कामगारांना आणि त्यांच्या वारसदारांना १८ ते ४० वयोगटासाठी लागू असलेल्या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
तरी परिसरातील सर्व बांधकाम कामगारांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार युनियनच्या वतीने करण्यात आले आहे. 🙏
