हलगा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धाकलू फकीरा बिळगोजी यांचे निधन; गावातील धार्मिक-सामाजिक कार्यात मोलाचे योगदान

हलगा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धाकलू फकीरा बिळगोजी यांचे निधन; गावातील धार्मिक-सामाजिक कार्यात मोलाचे योगदान

बेळगाव :
हलगा देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष, देवकारी पंच, प्रगतशील शेतकरी तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि बसवान गल्ली, हलगा येथील रहिवासी धाकलू फकीरा बिळगोजी (वय ८८) यांचे गुरुवार दिनांक ५ मार्च रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे.

धाकलू फकीरा बिळगोजी हे अत्यंत धार्मिक व समाजाभिमुख स्वभावाचे होते. हलगा गावातील मरगाई मंदिर, पेटी बसवन्ना मंदिर, ज्योतिबा भैरीदेव मंदिर, होळीकामान्ना मंदिर व मातंगी मंदिर या देवस्थानांच्या जीर्णोद्धार समितीचे ते अध्यक्ष होते. तसेच श्री कलमेश्वर, श्री भावकेश्वरी आणि श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार समितीचे ते कार्यकारी सदस्य म्हणूनही कार्यरत होते.

याशिवाय हलगा येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बी फातिमा दर्ग्याचे देवकारी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोहरम सण उत्साहात साजरा केला जात होता. गावातील प्रत्येक धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.

त्यांच्या निधनामुळे बिळगोजी कुटुंबियांसह संपूर्ण हलगा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दिनांक ५ मार्च रोजी दुपारी २.०० वाजता हलगा स्मशानभूमी येथे होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − 16 =

error: Content is protected !!