बेळगाव | १४ जुलै २०२५
कर्नाटकातील कन्नड प्राधिकरणाच्या अलीकडील बैठकीत शंभर टक्के कन्नड भाषेच्या सक्तीचा फतवा जाहीर करण्यात आला असून, त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात सिमाभाग युवा समितीने तातडीची बैठक घेऊन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी समितीने लोकप्रतिनिधींना भेटून अधिकृत निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता युवा समितीच्या शिष्टमंडळाची बेळगाव महानगरपालिकेतील महापौरांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत कन्नड सक्तीचा विरोध, मराठी भाषेच्या वापराबाबत धोरणात्मक चर्चा तसेच सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या भावनांची मांडणी करण्यात येणार आहे.
युवा समिती सिमाभागच्या वतीने सर्व मराठीप्रेमींना या भेटीप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून सीमाभागातील मराठी जनतेचा एकसंध आवाज महापौर व लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचू शकेल.
✊ मराठीचा अभिमान जपा – सीमाभागात हक्काची मागणी ठामपणे मांडा!