मराठी विद्यानिकेतन शाळेत शालेय निवडणूक उत्साहात संपन्न; पारदर्शक प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडले

मराठी विद्यानिकेतन शाळेत शालेय निवडणूक उत्साहात संपन्न; पारदर्शक प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ निवडले

बेळगाव | 12 जुलै 2025

मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे ELC क्लबच्या वतीने शालेय निवडणूक प्रक्रिया दिनांक 12 जुलै रोजी यशस्वीपणे पार पडली. यावर्षी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्यात आली, ही पद्धत सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थ्यांना लोकशाही निवडणुकीबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवली जावी, या उद्देशाने शाळेने हा उपक्रम हाती घेतला.

या निवडणुकीत एकूण 28 विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. प्रक्रियेअंती शाळेच्या मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली. निवडून आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

  • पंतप्रधान: अनिकेत जाधव
  • उपपंतप्रधान: वैजनाथ पाटील
  • विद्यार्थिनी प्रतिनिधी: स्नेहा हिरोजी
  • सहल मंत्री: शिवराज गवळी
  • क्रीडामंत्री: साईश हावळ
  • सांस्कृतिक मंत्री: मनाली बराटे
  • ग्रंथालय मंत्री: स्वप्निल मोरे
  • आरोग्य मंत्री: प्रतिज्ञा कुंभार
  • शिक्षण मंत्री: आदिती चोपडे

निवडणूक अधिकारी म्हणून सीमा कंग्राळकर यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांच्या सहकार्याला भारती शिराळे, रेणू सुळकर, वरदा देसाई, सुनीता पाटील, अश्विनी हलगेकर, प्रतिभा चोथे, तेजश्री हंडे, नयन परमोजी, श्रुती बेळगावकर, पद्मजा कुऱ्याळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण नियोजन समाज विभाग प्रमुख इंद्रजीत मोरे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, बी.जी. पाटील, नीला आपटे, सविता पवार, गौरी चौगुले यांची उपस्थिती लाभली.

नवीन मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांचे शाळेकडून अभिनंदन करून त्यांना पदभार प्रदान करण्यात आला. शाळेने घेतलेली ही अभिनव लोकशाही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण, जबाबदारी व संघटन कौशल्य आत्मसात करण्याची संधी देणारी ठरली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =

error: Content is protected !!