कंग्राळी बुद्रुकची कन्या रोशनी मुळीक ठरली बीएसएफ परेड कमांडर; गावात गौरवपूर्ण सत्कार

कंग्राळी बुद्रुकची कन्या रोशनी मुळीक ठरली बीएसएफ परेड कमांडर; गावात गौरवपूर्ण सत्कार

बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथील जवान रोशनी वसंत मुळीक हिने सीमा सुरक्षा दलात (BSF) परेड कमांडर म्हणून निवड होऊन गावाचा नावलौकिक वाढवला आहे. सिलिगुडी येथे झालेल्या प्रशिक्षणादरम्यान ४०० जवानांमधून उत्कृष्ट कामगिरी करत तिने बेस्ट ड्रिल पुरस्कार पटकावला असून ‘सर्वोत्कृष्ट नारीशक्ती’चा जयघोष झाला.

प्रशिक्षण पूर्ण करून गावात परतल्यानंतर रोशनी मुळीक हिचा कंग्राळी बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर जाहीर सत्कार करण्यात आला. शिक्षणप्रेमी अमोल पाटील यांनी तिचा गौरव करताना रोशनीने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. तसेच प्रत्येक भारतीय तरुणीने रोशनीच्या पावलावर पाऊल ठेवत देशसेवेत अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बोलताना रोशनी मुळीक हिने बीएसएफमधील प्रशिक्षण किती कठीण असते, ते प्रशिक्षण कसे पूर्ण केले आणि ४०० जवानांमधून सर्वोत्तम ठरण्याचा अनुभव सांगितला. आजच्या तरुणींनी स्वावलंबी बनून मुलांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहनही तिने केले.

या सत्कार कार्यक्रमाला ग्रामपंचायत पीडीओ गोविंद, ग्रामपंचायत सदस्य अनिल पावशे, यल्लोजी. पाटील, जयराम पाटील, तानाजी पाटील, मल्लाप्पा पाटील, नाथाजी पाटील, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, वसंत मुळीक तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 12 =

error: Content is protected !!