राकसकोप, बेळगाव | 13 जुलै 2025
राकसकोप गावातील जेष्ठ नागरिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावान कार्यकर्ते कै. श्री. बाबुराव साताप्पा पाटील उर्फ बी. एस. पाटील यांचे 9 जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. बी. एस. पाटील हे मराठा बँकेचे माजी संचालक म्हणून कार्यरत होते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विविध आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. शिक्षण, समाजकारण आणि जनहिताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. त्यांची ओळख एक शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून होती.
त्यांच्या कार्याचे स्मरण आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार, 14 जुलै 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता राकसकोप येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेचे आयोजन राकसकोप ग्रामस्थ कमिटीच्यावतीने करण्यात आले असून, कै. बी. एस. पाटील यांचे मित्र, सहकारी, हितचिंतक, समाजबांधव आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यांच्या सामाजिक योगदानाची आठवण आणि प्रेरणा भविष्यातही कायम राहील, हीच त्यांच्या श्रद्धांजलीची खरी भावना ठरणार आहे.