महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते श्री.अजितदादा पवार यांचे दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9.30 च्या दरम्यान विमान अपघातात दुःखद निधन झाले.
या धक्कादायक निधनामुळे जसा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला तसा सीमाभागातील माणूसही दुःख सागरात कोसळला, आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने अजितदादा पवार यांना अध्यक्ष शुभम शेळके व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प वाहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अजितदादांना श्रद्धांजली वाहताना शुभम शेळके यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील दूरदृष्टी असलेला, फटकळ पण तेवढाच प्रेमळ व कणखर नेता तसेच धडाडीने निर्णय घेणार मंत्री नेता आज महाराष्ट्रने गमावला ही पोकळी महाराष्ट्र कधीच भरून काढू शकत नाही,अशी आदरांजली वाहिली.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी अजितदादांच्या निधनाने जसे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे तसेच सीमावशीयांचेही प्रचंड नुकसान झाले आहे, सीमावासीयांच्या भावना जाणून घेणारा व प्रत्येक कार्यकर्त्यांची काळजी घेणारा, प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता आज समस्त देशाने गमावला अशी भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे,संजय बैलूरकर,अशोक घगवे,राजू पाटील,नीलेश काकतकर,विश्वनाथ येळ्ळूरकर,अभिषेक कारेकर,अमर कडगावकर,चेतन खोटे, रोहित जाधव,ओमकार जाधव,साहिल तिनेकर आदी उपस्थित होते.
