बेळगाव : कॅपिटल वन सोसायटीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संचालक मंडळ सदस्य व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. याप्रसंगी संचालक मंडळाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत देशाच्या संविधानातील मूल्ये, लोकशाही आणि नागरिकांचे कर्तव्य यावर मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर सोसायटीच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी देशाच्या एकता, अखंडता आणि संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडले. संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीमुळे प्रजासत्ताक दिन सोहळ्याला विशेष शोभा प्राप्त झाली.
