७७ व्या भारतीय लोकतंत्र दिनानिमित्त बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची भव्य स्केटिंग रॅली

७७ व्या भारतीय लोकतंत्र दिनानिमित्त बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची भव्य स्केटिंग रॅली

बेळगाव :
७७ व्या भारतीय लोकतंत्र दिनानिमित्त बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने भव्य स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये असोसिएशनच्या एकूण ४० स्केटर्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही रॅली बेळगाव येथील कॉर्पोरेशन स्केटिंग रिंक येथे आयोजित करण्यात आली होती.

या रॅलीत वय वर्षे ३ ते २५ दरम्यानच्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला. हातात तिरंगा घेत “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “हर घर तिरंगा” अशा घोषणांच्या गजरात सलग ७७ मिनिटे स्केटिंग करत भारतीय लोकतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या स्केटिंग रॅलीचे उद्घाटन स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगेश कुलकर्णी, तुकाराम पाटील, सागर चौगुले यांच्यासह बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे पदाधिकारी, स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रॅलीमध्ये शल्य तरळेकर, प्रांजल पाटील, आर्य कदम, आन्वी सोनार, जानवी तेंडूलकर, अमिषा वेर्णेकर, आरशान माडीवाले, प्रसन्न वाणी, ऋषीकेश पसारे, आशिष अंगडीकर, निधी मन्नूकर, सृष्टी राठोड, सिद्धार्थ पाटील, प्रीतम बागेवाडी, गर्व लोहार, देवांश जाधव, लावण्या भंडारे, रितेश, दिव्या भंडारे, सत्यम पाटील, तुलसी, द्रीशा संभाजी, सोनम धामणेकर, गगन जैन, पृथ्वीराज एन. डी., धनुष आचार, रीवा नाईक, प्राणिका मोटेकर, सार्थक मारडोळकर, साईराज नाईक यांच्यासह इतर अनेक स्केटर्सनी सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या माध्यमातून बेळगावातील तरुण पिढीमध्ये देशभक्ती, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

error: Content is protected !!