बेळगाव : मोदगा येथील सरकारी शाळेतील १६० विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथच्या वतीने स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. थंडीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
याच कार्यक्रमात “शिक्षण का सहारा” या योजनेअंतर्गत पात्र अनाथ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. या आर्थिक सहाय्यामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागणार आहे.
शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविलेला हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षकवृंद, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. मोदगा शाळा प्रशासनाच्या वतीने रोटरी क्लबचे आभार मानण्यात आले.
