बेळगावात गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवातचव्हाट गल्लीतील ‘बेळगावचा राजा’ गणपतीचा पारंपरिक पाटपूजन सोहळा उत्साहात

बेळगावात गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवातचव्हाट गल्लीतील ‘बेळगावचा राजा’ गणपतीचा पारंपरिक पाटपूजन सोहळा उत्साहात

बेळगाव : गणेशभक्तांच्या मनात गणेशोत्सवाची चाहूल लागली असून शहरासह परिसरात उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. विविध भागांत गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांना ऑर्डर देण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी गणेश जयंतीचे औचित्य साधत बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्लीतील गणपती मंडळाचा पारंपरिक पाटपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या पाटपूजनाने गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात मानली जाते. त्यामुळे या सोहळ्याबाबत गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. चव्हाट गल्ली येथील ‘बेळगावचा राजा’ गणपती हे सीमाभागातील एक अत्यंत लोकप्रिय व श्रद्धास्थान मानले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून येथील गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व पारंपरिक उपक्रमांसाठी ओळखला जातो.

पाटपूजन सोहळा हा मंडळाच्या वर्षभराच्या कार्याचा प्रारंभ समजला जातो. या पूजनानंतरच गणेशमूर्तीची निर्मिती, मंडप सजावट व इतर नियोजनाची कामे औपचारिकपणे सुरू होतात. हा सोहळा सायंकाळी सात वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक, चव्हाट गल्ली परिसरात पार पडला.

यावेळी माजी आमदार अनिल बेनके, विश्व हिंदू परिषदचे विजय जाधव, अभी वेरणेकर, प्रवीण धामणेकर, वमुरगेंद्र पाटील, रोहित रावळ, शोल्क कडोलकर, मूर्तिकार रवी लोहार, मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक काळीमिर्ची यांच्यासह मंडळाचे उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनील जाधव, पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.

पाटपूजनानंतर सुमारे सहा हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत गणेशभक्तांनी जल्लोष करत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. बेळगावात यानिमित्ताने गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकच रंग चढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =

error: Content is protected !!