बेळगाव, शास्त्री नगर |
शास्त्री नगर येथील ज्ञानमंदिर इंग्रजी माध्यम शाळेत आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एक आगळीवेगळी आणि संस्कारक्षम गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. या दिवशी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन, तसेच गुरुपूजन आणि मातापित्यांचे पाद्यपूजन करून विद्यार्थ्यांना गुरुत्व व कृतज्ञतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वॉर्ड क्रमांक १६ चे नगरसेवक राजू भातकांडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंचा सन्मान, संस्कार आणि शिक्षणाचे मोल पटवून देणारे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुप्रिया हेबाळकर, कृष्टीना अँथोनी, संध्या सुतकट्टी आणि बी. बी. देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनीच केले, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि अभिव्यक्ती कौशल्य उजळून निघाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फरीदा मिर्झा यांनी केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुरुप्रेम आणि कृतज्ञता भावना जोपासली गेली, असे मत पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले.