कुद्रेमानी |
कुद्रेमानी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना युवा समितीच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मुरकुटे यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. वरपे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अॅड. अश्वजीत चौधरी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सीमाभागातील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व आवश्यक आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज असून, युवा समितीचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.
कार्यक्रमाला एम. बी. गुरव, नागेश राजगोळकर, शिवाजी शिंदे, प्रतीक चौगुले, सुशांत शिंदे, एस. एस. कोळसेकर, जी. एस. गावडे, सी. बी. मडिवाळर, के. बी. पाटील, एल. व्ही. कुट्रे, एस. एस. पाटील, एस. डी. बेळवडी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार के. एल. गुंजीकर यांनी मानले.