बेळगाव :
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन (SSAF) यांच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील सुतार व त्यांच्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सर्व सुतार व त्यांच्या कामगारांना मोफत विमा पॉलिसी देण्यात येणार आहे.
दैनंदिन कामकाजात सुतारांना अपघाताचा धोका अधिक असल्याने, अशा प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे सुतार बांधवांना सुरक्षिततेची हमी मिळणार असून त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक सुतारांनी आधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन गणेशपूर रोडवरील गुड शेफर्ड स्कूल समोर असलेल्या कन्स्ट्रक्शन जंक्शन येथे संपर्क साधावा, असे आवाहन SSAF च्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 8618993767 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 असून, जास्तीत जास्त सुतारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे फाउंडेशनकडून सांगण्यात आले आहे.
